ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या्चे आयोजन

ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या्चे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर यांच्या वतीने  ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या्चे आयोजन दिनांक 24.05.2021 ते 27.05.2021 दरम्यान करण्यांत आले असून सदर मेळाव्या मध्ये Arms India Pvt. Ltd., Talific India Pvt. Ltd.,  MPTA Education, Magus Customer Dialog Pvt. Ltd., Varsa Plastic Pvt. Ltd., Warad Biotech Pvt. Ltd., Saharsh Gifts and Home Decore, PG Electroplast Pvt. Ltd .इ.कंपनीने त्‍‍‍‍‍‍‍यांचेकडील 855 पेक्षा अधिक पदे सदर मेळाव्या करीता अधीसुचीत केलेली आहेत. तरी ह्या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे. अधिक माहिती करिता

www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला आजच भेट देऊन ऑनलाईन अप्‍‍‍‍‍‍लॉय करुन आपला सहभाग नोंदवावा तसेच ऑनलाइन अप्लाय करतांना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 02382-245183 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

टीप:- सदर मेळावा पूर्णत: ऑनलाईन असून,ऑनलाईन पध्दतीनेच मुलाखती घेऊन निवड करण्यात येणार आहे.सहभागी होण्याकरिता प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची गरज नाही


Click Here to Visit

What's Your Reaction?

like
4
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
2